'भाजपला वैयक्तिक चरित्रहनन करून बदनाम करण्याची सवय' - जितेंद्र आव्हाड यांच्या बद्दल बातमी
भाजपला वैयक्तिक चरित्रहनन करण्याची सवय आहे. अखेल सत्याचा विजय झाल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

नागपूर - सिंचन घोटाळ्यात माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिल्यानंतर अजित पवार अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते यावर भरभरून उत्साहाने प्रतिक्रिया देत आहेत. भाजपला वैयक्तिक चरित्रहनन करून बदनाम करण्याची सवय आहे. त्यांनी अजित पवार यांच्या संदर्भात बदनामीचा डाव खेळला. पण, अखेर सत्याचा विजय झाल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. पाच वर्षांच्या काळात अजित पवारांना आणि त्यांच्या कुटुंबाला किती मानसिक त्रास सहन करावा लागला असेल, याची कल्पना न केलेली बरी असेही ते म्हणाले.