महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2022, 3:13 PM IST

Updated : Nov 25, 2022, 4:05 PM IST

ETV Bharat / state

Actor Priyanshu Kshatriya : ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला अटक; 'हे' आहे प्रकरण

‘झुंड’ या चित्रपटात (Jhund cinema) मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय (Jhund cinema Actor Priyanshu Kshatriya) याला चोरीच्या आरोपाखाली अटक (Priyanshu Kshatriya arrested again theft case) करण्यात आली आहे. अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला दोन वर्षांपूर्वी धावत्या ट्रेनमधून मोबाईल चोरी करणाऱ्या प्रकरणात देखील लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. Nagpur Crime, Latest news from Nagpur

Jhund Cinema Actor Priyanshu Kshatriya
प्रियांशू क्षत्रिय याला पुन्हा चोरीच्या आरोपाखाली अटक

नागपूर :महानायक अमिताभ बच्चन स्टार ‘झुंड’ या चित्रपटात (Jhund cinema) मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय (Jhund cinema Actor Priyanshu Kshatriya) याला चोरीच्या आरोपाखाली अटक (Priyanshu Kshatriya arrested again theft case) करण्यात आली आहे. नागपूर शहर पोलिसांनी (Priyanshu Kshatriya arrested by Nagpur Police) गुरुवारी ही माहिती दिली आहे. Nagpur Crime, Latest news from Nagpur

दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार -शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे रहिवासी प्रदीप मांडवे यांच्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. या चोरी प्रकरणाचा तपास करताना मानकापूर पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी प्रियांशू क्षत्रिय याचा चोरी प्रकरणात सहभाग असल्याचा खुलासा केला त्यानंतर पोलिसांनी प्रियांशू क्षत्रियला अटक केली आहे.

मोबाईल चोरी प्रकरणात झाली होती अटक:अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला दोन वर्षांपूर्वी धावत्या ट्रेनमधून मोबाईल चोरी करणाऱ्या प्रकरणात देखील लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती.

Last Updated : Nov 25, 2022, 4:05 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details