महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीतील वाहन उलटले; तिघांचा मृत्यू, 6 जखमी - 6 जखमी नागपूर

नागपूरच्या सीमेवरील खरबी परिसरातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते काल रात्री उशिरा दुर्गा विसर्जन करायला पाचगाव परिसरात गेले होते. देवीचे विर्जन करुन परत येताना गाडी वळणावर उलटली.

नागपूरात दुर्गा विसर्जनाची गाडी उलटली

By

Published : Oct 9, 2019, 4:10 PM IST

नागपूर- येथे दुर्गा विसर्जन करुन परतणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. यात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील विहिरगाव मध्ये घडली आहे. मृतकांमध्ये वाहनचालकाचाही समावेश आहे.

हेही वाचा-जगनमोहनच्या गीताची शिवसेनेने केली हुबेहुब 'नक्कल'?

नागपूरच्या सीमेवरील खरबी परिसरातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते मंगळवारी रात्री उशिरा दुर्गा विसर्जन करायला पाचगाव परिसरात गेले होते. देवीचे विर्जन करुन परत येताना पहाटे सूर्योदय कॉलेज जवळ तीव्र वळणावर महिंद्रा बोलेरो गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी वळणावर उलटली. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून 6 जण किरकोळ जखमी आहे. महेश सोनटक्के (17 वर्ष), शंकर धुर्वे (18 वर्ष), मंगेश नानोरे (वाहन चालक) अशी मृतांची नावे आहेत.


ABOUT THE AUTHOR

...view details