नागपूर:जयेश कांथा उर्फ पुजारी हा सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. येथे जीवाला धोका आहे असे त्याने नागपूरच्या खंडपीठामधील याचिकेत नमूद केले आहे. त्याच्याविरुद्ध कर्नाटकात दोन फौजदारी खटले प्रलंबित आहेत. आधारावर मला बेळगाव येथे स्थानांतरित करण्यात यावे, अशी त्याने याचिकेत मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील खामला येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयात काही मिनिटांच्या अंतरात सलग तीन धमकीचे फोन आले होते. जयेश कांथा उर्फ पुजारी नावाने धमकीचे फोन कॉल आले आहेत. या वेळी आरोपीने १० कोटीची खंडणी मागितल्याने एकच खळबळ उडाली होती. बंगळुरू येथील एका तरुणीच्या मोबाईलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन कॉल करण्यात आले होते. त्या तरूणीने फोन केला नसला तरी त्या तरुणीचा मित्र जयेश कांथा उर्फ पुजारी कारागृहात बंद असलेल्या कारागृहात कैद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतल तपास केला.
Nitin Gadkari Extortion Case : जीवाला धोका असल्याने बेळगाव कारागृहात हलवा..जयेश पुजारीची नागपूर खंडपीठात याचिका - जयेश पुजारी बेळगाव तुरुंग याचिका
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शंभर कोटीची खंडणी मागणारा आरोपी जयेश पुजारीला महाराष्ट्राच्या तुरुंगातील मुक्काम नकोसा झाला आहे. त्याने कर्नाटक येथील बेळगाव तुरुंगात स्थानांतरित करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्याच्या याचिकेवर सुनावणी घेतली आहे. राज्याच्या गृह विभागाच्या सचिवांसह इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
पीएफआय'च्या संपर्कात होता जयेश:जयेश पुजारा उर्फ शाकीरचे संबंध दहशतवादी संघटनांसोबत असल्याने नागपूर पोलिसांनी त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पीएफआय नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा सचिव मोहम्मद अफसर पाशाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर आणखी एका कट्टरवादी पदाधिकऱ्यांच्या तो संपर्कात होता अशी माहिती तपासात पुढे आली असून त्यांनी जयेशचा ब्रेन वॉश केल्याचे पुढे आले आहे.
तपास एएनआयकडे:नितीन गडकरी धमकी व खंडणी प्रकरणात नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला केल्यानंतर आरोपी नागपूर कारागृहात आहे. चौकशीदरम्यान त्याने अनेक नेत्यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. संवेदनशील प्रकरण असल्याने हा तपास एनआयकडून सुरू करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी उपमहानिरीक्षक व अधीक्षक दर्जा असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी गुरुवारी संबंधित नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
जयेश पुजारीला बेळगाव कारागृहातून केली होती अटक:याप्रकरणी नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी नावाच्या गुंडाला बेळगाव कारागृहातून अटक केली होती. बेळगाव कारागृहातूनच केलेल्या फोनचा सुगावा मिळाल्यानंतर ही अटक करण्यात आली. नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीच्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याबाबतचे महत्त्वाचे धागेदोर मिळाले आहेत.
हेही वाचा-