महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरण; एनआयए अधिकारी नागपुरात दाखल - जयेश पुजारीला अटक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बंगळुरू येथील कारागृहातून खंडणी मागितल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी जयेश पुजारीला अटक केली होती. या प्रकरणी आता एनआयए तपास करणार असून एनआयएचे वरिष्ठ अधिकारी नागपुरात दाखल झाले आहेत. .

Nitin Gadkari Extortion Case
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 25, 2023, 11:02 AM IST

Updated : May 25, 2023, 12:45 PM IST

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी जयेश पुजारी या आरोपीला बंगळुरुच्या कारागृहातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक आज नागपुरात पोहोचले आहे. एनआयएच्या दोन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील आरोपी जयेशला एनआयए ताब्यात घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एनआयएने सुरू केला तपास :नागपुरात पोहोचल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे एनआयएचे अधिकारी तपासत आहेत. नितीन गडकरी यांना जानेवारी आणि मार्चमध्ये 110 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. नागपूर पोलिसांच्या तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. एनआयएची टीम पोलीस जिमखानामध्ये दाखल झाली असून असून धमकी प्रकरणाशी संबंधित नागपूर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना ब्रीफिंग देण्यासाठी पोलीस जिमखानामध्ये पोहोचले आहेत. नितीन गडकरी धमकी प्रकरणी एनआयएचे दोन वरिष्ठ अधिकारी नागपुरात पोहोचले आहेत. एक डीआयजी दर्जाचा अधिकारी असून दुसरा एसपी दर्जाचा अधिकारी आहे. एनआयएची मुंबई टीम त्याची चौकशी करत आहेत. नागपूर पोलिसांचे दोन अधिकारी कागदपत्रे तपासत आहेत.

जयेश पुजारीला बेळगाव कारागृहातून अटक :याप्रकरणी नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी नावाच्या गुंडाला बेळगाव कारागृहातून अटक केली होती. बेळगाव कारागृहातूनच केलेल्या फोनचा सुगावा मिळाल्यानंतर ही अटक करण्यात आली. नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीच्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याबाबतचे महत्त्वाचे धागेदोर मिळाले आहेत.

काय आहे प्रकरण :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन खंडणी मागण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हा फोन बंगळुरू येथील कारागृहातून आल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या फोनचे धागेदोरे मिळुन येत नव्हते. अखेर हा फोन जयेश पुजारी या गुंडांने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. जयेश पुजारी या गुंडाला कारागृहातूनच ताब्यात आले होते. मात्र जयेशचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयातून एनआयए या प्रकरणाचा तपास करणार आहे.

हेही वाचा -

  1. Arvind Kejariwal To Meet Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज घेणार शरद पवारांची भेट
  2. HSC Results 2023 : विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली; गुरुवारी बारावीचा निकाल, 'असा' करा चेक
  3. PM Modi Returns To India : तीन देशाचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले, भाजपने केले जंगी स्वागत
Last Updated : May 25, 2023, 12:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details