महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गुजरातच्या ऊस दराचा विचार करून महाराष्ट्रात असलेली तफावत दूर करणार' - एफआरपीची रक्कम द्यावी लागणार असल्याचे जयंत पाटलांचे वक्तव्य

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या प्रक्रियेशी सर्व साखर कारखान्यांना कटिबद्ध राहावे लागणार असल्याचे वक्तव्य मंत्री जयंत पाटील यांनी केले. तसेच गुजरातमधील ऊस दराचा विचार करून महाराष्ट्रात असलेली तफावत दूर करून शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचे पाटील म्हणाले.

nagpur
मंत्री जयंत पाटील

By

Published : Dec 20, 2019, 7:53 PM IST

नागपूर -ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या प्रक्रियेशी सर्व साखर कारखान्यांना कटिबद्ध राहावे लागणार असल्याचे वक्तव्य मंत्री जयंत पाटील यांनी केले. तसेच गुजरातमधील ऊस दराचा विचार करून महाराष्ट्रात असलेली तफावत दूर करून शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचे पाटील म्हणाले.

एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असतानाही काही कारखाने 'तुकड्या तुकड्या'ने पैसे देतात. ज्या कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकबाकी आहे, त्यांनी ती लवकरात लवकर देणे गरजेचे असल्याची मागणी सातत्याने सभागृहात केली जात होती. यावर बोलताना जयंत पाटील यांनी एफआरपीची रक्कम सर्व कारखान्यांना देणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील साखर कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व या स्थितीतून या क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करणार असल्याचेही पाटील म्हणाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details