नागपूर - राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमावा, अशी मागणी 'जनमंच'ने केली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे ही विनंती करण्यात आली. सिंचन घोटाळ्यात यापूर्वीच सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी जनमंचने केली होती.
सिंचन घोटाळा : निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्याची मागणी - नागपूर खंडपीठ बातमी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा अमरावती आणि नागपूर विभागातील प्रकरणांमध्ये सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
हेही वाचा-'भाजपचे सर्व भ्रष्टाचार हळूहळू बाहेर काढणार..'
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा अमरावती आणि नागपूर विभागातील प्रकरणांमध्ये सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या तपास यंत्रणांकडून तपास काढून टाकावा, अशी मागणी केली होती. एसीबीकडून अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे देखील जनमंचने म्हटले आहे. आता निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमा, अशी मागणी न्यायाधीशांना करण्यात आली.