नागपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून दोन दिवसीय 'ऐच्छिक' जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, नागपुरकरांनी या कर्फ्यूला अल्प प्रतिसाद दिला. बाजारपेठा बंद असल्या तरी, शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिसून आली. नागपुरकरांनी या जनता कर्फ्यूला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे पाहायला मिळाले.
शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महानगरपालिकेकडून दोन दिवसीय ऐच्छिक जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली आहे. काल या जनता कर्फ्यूला नागपुरकरांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. मात्र, दुपारनंतर अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचेही चित्र दिसून आले. त्यामुळे आजही अशीच काहीशी स्थिती शहरातील रस्त्यावर दिसून येत आहे.