महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

RSS Headquarter Targeted by Terrorists : जैशच्या दहशतवाद्याला कोणताही लोकल सपोर्ट मिळाला नाही - पोलीस आयुक्त अमितेशकुमार - जैश ए मोहम्मद संघटना दहशतवादी नागपूर

नागपूरचे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Nagpur Cp Amiteshkumar )यांनी स्पष्ट केले आहे की दहशतवाद्यांच्या हस्तकाला नागपुरात कोणताही लोकल सपोर्ट मिळू शकला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथील मुख्यालय ( RSS Headquarter Nagpur ) पुन्हा एकदा दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट होताच सुरक्षा एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

Rss Headquarter
आरएसएस मुख्यालय

By

Published : Jan 10, 2022, 6:06 PM IST

नागपूर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथील मुख्यालय ( RSS Headquarter Nagpur ) पुन्हा एकदा दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट होताच सुरक्षा एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत. ( RSS Headquarter Targeted by Terrorists ) जैशचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख याने नागपूर येऊन रेकी केल्याची बाब उघड झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी तपासाला ( Nagpur Police Investigation ) सुरूवात केली आहे.

याबाबत बोलताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार

पोलीस आयुक्त काय म्हणाले?

रईस अहमद असाद उल्ला शेख ज्यावेळी नागपूरला संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी आला होता तेव्हा त्याला नागपुरातील एका स्थानिक नागरीकाने मदत पुरावल्याचं बोललं जातं आहे. नागपूरचे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Nagpur Cp Amiteshkumar )यांनी स्पष्ट केले आहे की दहशतवाद्यांच्या हस्तकाला नागपुरात कोणताही लोकल सपोर्ट मिळू शकला नाही. त्यामुळे तो त्याच्या कामात अपयशी ठरला होता. त्याच्याकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी नागपूर पोलीस त्या दहशतवाद्याची कास्टडी घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जैशचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख याला 'तुम नागपूर जाओ, तुम्हारी मदत के लिये एक आदमी आयेगा', असा संदेश देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात तो नागपुरला आल्यानंतर कुणीही त्याच्या मदतीला पुढं आले नाही. म्हणून तो त्याचे मिशन पूर्ण करू शकला नसल्याची माहिती आत्तापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

हेही वाचा -RSS headquarters targeted by terrorists : तपास यंत्रणांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेतले पाहिजे - देवेंद्र फडणवीस

दहशतवादी रईस अहमदची कस्टडी घेणार -

दहशतवादी रईस अहमद असाद उल्ला शेख हा नागपुरात कुणाच्या मदतीने आला? त्याने नागपुरात कुठे कुठे रेकी केली? कोणती माहिती गोळा केली? आणि ती कुणाला पुरवली? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नागपूर पोलीस त्या दहशतवादी रईस अहमदची कस्टडी घेणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details