महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरच्या जान वाघिणीचा कोरोना अहवाल अखेर निगेटिव्ह - महाराजबाग प्राणी संग्रहालय

सकाळी वाघिणीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आधीपासूनच वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ज्यात जानला खोकला नसून तिच्या शरीराचे तापमान देखील सामान्य आहे. महाराजबाग प्राणी संग्रहालय प्रशासनाला आरटी-पीसीआर चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती, रात्री उशिरा अहवालाचा मॅसेज प्राप्त झाला असून, जानची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती मिळल्याचे डॉ. सुनील बावसकर यांनी सांगितले आहे.

वाघिणीचा कोरोना अहवाल
वाघिणीचा कोरोना अहवाल

By

Published : May 20, 2021, 11:57 PM IST

नागपूर -मध्य भारतातील प्रसिद्ध असलेल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वाघिणीला सर्दी झाल्याचे लक्षात येताच आज (गुरुवार) त्या वाघिणीची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. जान असे या वाघिणीचे नाव आहे. जान वाघिणीचे नाक वाहत असल्याने तातडीची खबरदारी म्हणून कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला असून ज्यामध्ये जानचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आल्याची माहिती महाराजबाग प्राणी संग्रहालययाचे प्रभारी डॉ. सुनील बावसकर यांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसापासून जान नामक वाघिणीला सर्दी झाल्याचे निदर्शनास येताच वाघिणीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. सकाळी वाघिणीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आधीपासूनच वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ज्यात जानला खोकला नसून तिच्या शरीराचे तापमान देखील सामान्य आहे. महाराजबाग प्राणी संग्रहालय प्रशासनाला आरटी-पीसीआर चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती, रात्री उशिरा अहवालाचा मॅसेज प्राप्त झाला असून, जानची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती मिळल्याचे डॉ. सुनील बावसकर यांनी सांगितले आहे,त्यामुळे प्राणी संग्रहालयाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details