नागपूर- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे हिने केले आहे. शहर पोलिसांच्या मदतीने ज्योतीने आज नागपुरात जनजागृती केली. केवळ २४ इंच उंची असलेल्या ज्योती आमगेचे नाव गिनिज बुकमध्ये दाखल आहे.
लॉकडाऊन आहे, कृपया घरातच रहा- ज्योती आमगे - नागपूर
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची समजूत काढण्यासाठी ज्योती आमगे पुढे सरसावली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ज्योतीने यावेळी नागरिकांना आवाहन केले आहे.
लोकांना जागरुक करताना ज्योती आमगे
शहरात कोरोना बधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. तरी देखील नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य समजले नसल्याचे दिसून आले आहे. घरी बसण्या ऐवजी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत आहे. त्यामुळे, अशा लोकांची समजूत काढण्यासाठी ज्योती आमगे पुढे सरसावली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ज्योतीने नागरिकांना आवाहन केले आहे.