नागपूर -तुला कोर्टात बघून घेईन असे म्हणत कोर्टात जाणे हे भारतीय दंडविधान कायद्यानुसार धमकी ठरू शकत नाही, तसेच दिवाणी किंवा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा ठरू शकत नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रजनीकांत बोरले यांनी ही याचिका दाखल केली होती. मार्च 2009 मध्ये तत्कालीन पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडे यांच्याशी काही कारणावरून त्यांचा वाद झाला होता. यात तुम्हाला कोर्टात बघून घेईन, तुमच्या चुकीच्या बाबी कोर्टासमोर मांडेन असं रजनीकांत बोरले यांनी या पुरवठा अधिकाऱ्याला म्हटले होते. या कारणावरून बोरले यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.