नागपूर - विविध राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या हायटेक टोळीला ( Thieves Gang In Nagpur )नागपूर शाखेने अटक ( Nagpur Police ) केली आहे. ही टोळी मोबाईल फोनचा वापर करणे प्रकर्षाने टाळायची, त्यामुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नव्हती. ही टोळी महागड्या कार आणि वॉकी-टॉकी वापरून घरफोड्या करीत असते. केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही घरफोडी केल्याची कबूली या टोळीने दिली आहे.
चार ते पाच ठिकाणी घरफोड्या - या टोळीने काही दिवसांपूर्वी नागपुरात देखील चार ते पाच ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. या घटनांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास ( Investigation Through CCTV ) करताना आरोपी कारमध्ये बसून दुसऱ्या राज्यात जाताना दिसून आले आरोपी पळून जाताना वेळोवेळी कारचा नंबर प्लेट बदलल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यंत्रणांच्या माध्यमातून पोलिसांनी या कारचा शोध सुरु केला,मात्र आरोपी मोबाईल वापरात नसल्याने त्यांचा सुगावा लागणे देखील कठीण होते होते.