नागपूर :यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी (pollution free Diwali) व्हावी. म्हणून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आगळा वेगळा यशस्वी प्रयत्न केला जातो आहे. बारुद (दारुगोळा) भरलेल्याफटाक्यांची आतिषबाजी करण्याऐवजी बीज रूपातील फटाके तयार करून त्यांचा निशुल्क वाटप करण्यास सुरुवात झाली( seed crackers instead of gunpowder crackers) आहे. आगळे- वेगळे असलेले हे फटाके आपल्या पर्यावरण संवर्धनासाठी फार महत्वाचे सिद्ध होणार आहेत.
प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न :दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा सण. दीपोत्सवाचा हा ऐतिहासिक पर्व अविस्मरणीय ठरवण्यासाठी प्रत्येकजण मनसोक्त फटाके फोडून आनंद साजरा करीत असतात. मात्र, फटाके फोडतांना ध्वनी आणि वायू प्रदूषणही फार मोठ्या प्रमाणात होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्राम आर्ट्स प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून अभिनव प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
फटाक्यांमध्ये बीज :दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यामुळे प्रदूषण होत असल्यामुळे ग्राम आर्ट्स प्रकल्पाने चक्क फटाक्याच्या रुपात विविध भाजी-पाल्याचे बीज तयार केले आहे. सुतळी बॉम्ब,अनार, रस्सी, चक्कर, लाल फटाके, रॉकेटसह विविध 10 फटाक्यांमध्ये गवार, मिरची, भेंडी, टमाटर, पपई, गोबी, कांदे , आलू, लसूण सह अनेक भजीपाल्यांचे बीज टाकल्या टाकण्यात आले आहेत. नागरिकांनी फटाके फोडण्यापेक्षा पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करून आपल्या घरी फटक्याच्या रुपात विविध बीज लावावे, यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.