महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 17, 2021, 3:30 PM IST

ETV Bharat / state

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात विदर्भावर अन्याय, बावनकुळेंचा आरोप

कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात प्रचंड भेदभाव सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

injustice-on-vidarbha-in-distribution-of-remedesivir-
injustice-on-vidarbha-in-distribution-of-remedesivir-

नागपूर -कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात प्रचंड भेदभाव सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या काही मातबदार नेत्यांनी आपल्या जिल्ह्याकरिता रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पळवला असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. ठाण्यात प्रति रुग्णामागे दोन रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहे तर नागपूरमध्ये मात्र दोन रुग्णांमागे केवळ एकच इंजेक्शन देण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी पुराव्यानिशी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंचा राज्य सरकारवर आरोप
महाराष्ट्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपा संदर्भात एक निश्चित धोरण आखले आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते स्वतःच्या जिल्ह्यांकरिता रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य साहित्याचा साठा पळवत आल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. त्या तुलनेत नागपूर आणि विदर्भात सर्वाधिक आवश्यकता असताना देखील रेमडेसिवीर इंजेक्शनचा हवा तसा पुरवठा होत नसल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. एका बाजूला ठाण्याचे जिल्हाधिकारी प्रति कोरोनाबाधित रुग्णामागे दोन इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आदेश काढत आहेत, तर त्याचबरोबर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन रुग्णामागे एक इंजेक्शन देण्याचे आदेश काढले आहेत. नागपूरमध्ये कोरोनाची स्थिती अतिशय भयावह असताना रुग्णांचे नातेवाईक एका-एका इंजेक्शनसाठी भटकत आहेत. राज्य सरकारने नागपूर आणि विदर्भावर घोर अन्याय केला असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
भेदभावाचा दिला पुरावा -
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप करताना बावनकुळे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाची प्रत सादर केली, ज्यामध्ये प्रति रुग्णामागे किती इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आलेला आहे, याची आकडेवारी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details