महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औद्योगिक गरजेनुसार कौशल्य विकासासाठी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे - butibori manufactures association

औद्योगिक विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे ही काळाची गरज ओळखून बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोशिएशन कडून बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत संस्थेच्या सभागृहात कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना जिल्हाधिकारी यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

collector ravindra thakre
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

By

Published : Dec 20, 2020, 6:19 PM IST

Updated : Dec 20, 2020, 8:15 PM IST

नागपूर -औद्योगिक क्षेत्रात ज्या उद्योगाची सर्वात जास्त आवश्यकता आहे त्याठिकाणी लागणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षण मिळावे, यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केले. ते बुटीबोरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचे संबोधन.

औद्योगिक विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे ही काळाची गरज ओळखून बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनकडून बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत संस्थेच्या सभागृहात कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना जिल्हाधिकारी यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

इमारतीच्या जागेचा प्रश्न लवकर सोडविण्यात येईल -

रिफॅक्टरीज हे पहिले प्रशिक्षणाचे सत्र पूर्ण झाले असून वेल्डींग प्रशिक्षणाचे दुसरे सत्र सुरू होणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या गावी जावून या प्रशिक्षणाचे महत्त्व तेथील मुलांना समजावून प्रोत्साहित करावे. त्यामुळे प्रशिक्षित कामगार उद्योग क्षेत्राला मिळण्यास सोयीचे होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. हे प्रशिक्षण महत्वाचे असून प्रशिक्षणार्थींना निश्चितच लाभ होईल. प्रशिक्षण आयोजनासाठी येणाऱ्या अडचणी दूर करुन चांगले प्रशिक्षण कसे देता येईल? यावर भर द्यावा. प्रशिक्षण इमारतीच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -रेल्वेच्या मेन्टेंन्स व्हॅनला अपघात, अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प

मुलांना या प्रशिक्षणात जास्तीत जास्त सहभागी कसे करता येईल, यावर भर द्या. कोरोना विषाणू संसर्गामुळे या कामास उशीर लागला आहे. आता प्रादुर्भाव कमी होत असल्याने त्यास गती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. प्रशिक्षणाचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला असून पहिल्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी फायदा घेवून कार्यक्षम व कौशल्यक्षम व्हावे, त्यामुळे मनुष्यबळ निर्मितीत वाढ होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. असेच प्रशिक्षण इतर जिल्ह्यातही व्हावे, असे त्यांनी सांगितले.

अशा प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील -

जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे प्रशिक्षण उद्योगास प्रशिक्षित कामगार देईल. या शिबीराच्या आयोजनाबाबत विस्तृत माहिती बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी दिली. आयटीआयमधील मुलांना प्रशिक्षण देऊन येथील उद्योगात काम देण्याचे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात 9 ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात येईल. येथील कार्यप्रणाली समजावून सांगण्यात येईल. तसेच प्रशिक्षणार्थींना स्टायपेंड देण्यात येईल. या परिसरातील गणेशपूर येथे स्वयंसेवी संस्थेद्वारे(एनजीओ) महिलांना हॅन्डलुम व एम्ब्रॉयडरीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षित महिला कामगार उद्योग समुहाला मिळणार आहे. त्यांना उद्योगात सहभागी करण्यात येणार आहे.

Last Updated : Dec 20, 2020, 8:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details