नागपूर : नागपूर विमानतळावरील बोर्डिंग गेट परिसरात एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. वैमानिक नागपूरहून पुण्याला विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, विमानात चढण्यापूर्वीच ते बोर्डिंग गेटजवळ बेशुद्ध पडले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने वैमानिक कॅप्टन मनोज सुब्रमण्यम यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वैमानिकाचा मृत्यू झाला असला तरी पुढील मोठा अनर्थ टळल्याची चर्चा आहे.
विमानात हृदयविकाराचा झटका: भारतात दोन दिवसांत वैमानिकाचा हा दुसरा मृत्यू आहे. कतार एअरवेजच्या पायलटला बुधवारी विमानात हृदयविकाराचा झटका आला होता. याआधी स्पाईसजेट, अलायन्स एअर आणि सहारामध्ये काम केलेल्या वैमानिकाला दिल्ली-दोहा फ्लाइटच्या पॅसेंजर केबिनमध्ये प्रवास करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले होते.
मिग-२१ जैसलमेरमध्ये कोसळले :दुसरीकडेमिग-२१ हे भारतीय हवाईदलाचे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना ( MiG 21 Accident in Jaisalmer ) घडली होती. विमान राजस्थानमधील जैसलमेरजवळ नॅशनल पार्कजवळ कोसळले होते. या दुर्घटनेत वैमानिक विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा ( Wing Commander Harshit Sinha death ) मृत्यू झाला होता. ही घटना डिसेंबर 2021 रोजी जयपूर येथे घडली होती.