महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Indian Students Returned from Ukrain : यूक्रेनमधील अनुभव थरारक; भारतीय असल्याचा अभिमान - यूक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची भावना

रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक शांतता भंग झाली आहे. ( Ukrain-Russia War ) या युद्धाचा फटका हा आपल्या देशातील विद्यार्थ्यांना बसला आहे. युद्ध सुरू होताच युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. ( Indian Students in Ukrain ) विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या बॅचमध्ये नागपुरातील दोन विद्यार्थी परत आले आहेत. या विद्यार्थ्यांचे नागपूर विमानतळावर त्यांच्या पालकांनी स्वागत केलं. ( Indian Students Returned from Ukrain at Nagpur )

Indian Students Returned from Ukrain
यूक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची भावना

By

Published : Feb 28, 2022, 3:47 PM IST

Updated : Mar 15, 2022, 4:30 PM IST

नागपूर - रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक शांतता भंग झाली आहे. ( Ukrain-Russia War ) या युद्धाचा फटका हा आपल्या देशातील विद्यार्थ्यांना बसला आहे. युद्ध सुरू होताच युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. ( Indian Students in Ukrain ) विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या बॅचमध्ये नागपुरातील दोन विद्यार्थी परत आले आहेत. या विद्यार्थ्यांचे नागपूर विमानतळावर त्यांच्या पालकांनी स्वागत केलं. ( Indian Students Returned from Ukrain at Nagpur ) यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे बघायला मिळाले.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

युक्रेनमधून परत आलेले दोनही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत होते. भाग्यश्री कापसे आणि स्वप्नील देवगडे असे त्यांचे नाव आहेत. दोघेही सकाळी दिल्लीहून नागपूर विमानतळावर पोहोचले. युक्रेनवरुन हंग्री देशात आल्यावर एअर इंडियाच्या विमानाने हे विद्यार्थी भारतात पोहचले. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये हल्ला केल्यावर विद्यार्थी दहशतीमध्ये होते. दहा तास प्रवास करून हे विद्यार्थी हंग्री देशाच्या सीमेवर पोहचले होते. भारतात आल्यावर या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हेही वाचा -International flights : पुढील आदेशापर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदच राहणार

भारतीय असल्याचा सार्थ अभिमान -

आपल्या देशातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. मात्र, कोणीही चिंता करण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने भारत सरकार आणि भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना मायदेशी परत पाठवण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. ते बघता येत्या काही दिवसांमध्ये सर्व विद्यार्थी सुखरूप आपल्या घरी पोहोचतील. आता विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. ज्या बसमधून हे विद्यार्थी प्रवास करत होते. त्या बसच्या काचेवर भारतीय तिरंगा लावण्यात आला होता. तिरंगा बघून सर्व विद्यार्थ्यांना कोणताही त्रास दिल्याशिवाय पुढे जाऊ दिले जात होते. ही एक भारतीय म्हणून अभिमानाची बाब असल्याचं देखील विद्यार्थी म्हणाले आहेत.

Last Updated : Mar 15, 2022, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details