नागपूर :कर्तव्यदक्ष, कर्तव्यतत्पर आणि कर्तव्यपरायण भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढावी आणि दुश्मनांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी भारतीय संरक्षण, संशोधन आणि विकास संख्या डीआरडीओकडून बॉम्ब शोधून नष्ट करणारा रोबोट तयार करण्यात आला ( bomb detecting and defusing robot ) आहे. लवकरचं हा रोबोट भारतीय सैन्य दलात सक्रिय होणार आहे. सध्या हा रोबोट इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये डीआरडीओच्या प्रदर्शनीत ठेवण्यात आला ( Indian Science Congress Exhibition Nagpur ) आहे. रोबट विषयी माहिती जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांसोबतच शाळकरी विद्यार्थ्यांची विशेष गर्दी होत आहे.
सर्वाधिक गर्दी डीआरडीओच्या कॅम्पमध्ये : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात १०८ व्या भारतीय सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो प्रयोग आणि उपक्रममांची स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, सर्वाधिक गर्दी ही डीआरडीओच्या कॅम्पमध्ये दिसत ( DRDO Camp ) आहे. सैन्याचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्याची ईच्छा प्रत्येक भारतीयांना आहे,त्याचं बरोबर सैन्याकडे असलेले तंत्रज्ञान आणि संसाधन जाऊन घेण्यासाठी रोज हजारो नागरिक डीआरडीओ डोम मध्ये येत आहेत.