नागपूर- २०१८ पासून ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चारचाकी गाड्यासाठी लागणारे थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या किंमती ५ पटीने वाढल्या आहेत. तसेच दुचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये ३ पटीने वाढ झाली आहे. याचा सरळ फटका हा ऑटोमोबाईल उद्योगाला बसत असून ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ऑटोमोबाईल उद्योगातील मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर!
ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. परिणामी लोकांचा कल चारचाकी वाहन खरेदीकडे कमी झाला. सोबतच दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये देखील फरक दिसायला लागला आहे, अशी माहिती ऑटोबाईल डिलर्स असोसिएशन अध्यक्ष आशिष काळे यांनी दिली.
मंदी सदृश परिस्थिती बघता ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक नोकऱ्या देखील धोक्यात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेवर देखील याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. कारण, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकवरील ऑटोमोबाईल उत्पादक देश आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम ऑटोमोबाईल पार्टसच्या निर्यातीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.