नागपूर -जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात जास्तीची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
संघाच्या मुख्यालयातील सुरक्षेत वाढ; आता 'CISF' जवानांकडे जबाबदारी
जम्मू कश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात जास्तीची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सुरक्षेत संघ मुख्यालयालाही सुरक्षा पुरवली जाते. यात सिआयएसएफ जवान सुरक्षेसाठी असतात. आज (शुक्रवारी) अजून काही जवानांची संख्या वाढवली असून येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काल (गुरुवारी) संघप्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात 'मोदी है तो मुमकीन है' असे लोक जे म्हणतात ते खरे असल्याचे म्हणत त्यांनी ३७० कलमाबाबतीत घेतलेल्या निर्णयाला दुजोरा दिला होता. यामुळे सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
संघ मुख्यालयात संघाचे मोठे नेते राहतात. तसेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचाही मुक्काम मुख्यालयातच असतो. त्याचप्रमाणे भाजपचे अनेक मोठे नेते देखील संघ मुख्यालयाला भेटी देतात. यामुळे हा निर्णय घेतला आहे. नागपूर पोलिसांची एक तुकडी पूर्वीपासूनच संघ मुख्यालयात तैनात आहे.