नागपूर -मध्यंतरी काही दिवस रुग्ण मिळत नसल्याने लोक बिनधास्त झाले होते. परंतु आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये 7 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यासोबत मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे. 48 तासांत 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून यात 5 बाहेर जिल्ह्यातील, तर 11 शहर आणि ग्रामीण भागातील आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहे. आता शनिवार रविवार असे दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार आहे. शिवाय रात्री 9 नंतर बाजारात गर्दी राहू नये, यासाठी प्रशासन कठोर पाऊले उचलण्यासाठी सज्ज झाले आहे.
कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरिता प्रशासनाने पुन्हा पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. यासाठी शासकीय आणि खाजगी ठिकाणी होणाऱ्या चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार असल्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर एक नजर -
यामध्ये नागपुरात आठवड्याभराची आकडेवारी पाहता पॉझिटीव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. जास्तीत जास्त चाचण्या करून संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यात नागपूरमधील शहरी भागात 4, ग्रामीण भागात 2 तर, 2 बाहेर जिल्ह्यातील असे 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 4283 जणांचा नागपूरात मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात 6262 रुग्ण सक्रिय आहे. यात शहरात पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या अधिक असून 5196 आहे. तेच ग्रामीण भागात 1093 रुग्ण पॉझिटीव्ह आहे. सोमवारी शहर आणि ग्रामीण भागात 710 रुग्ण आढळून आले आहे.