महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशात महिला अत्याचाराच्या घटनात वाढ- विजय वडेट्टीवार - साकीनाका न्यूज

देशात कशा पद्धतीने महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, याकडे लक्ष वेधण्याचे काम मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नागपूरच्या निवस्थानी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई साकीनाका घटनेवरून केंद्राकडे बोट दाखवले. दरम्यान, शिक्षण आणि मेट्रो भरतीत मागासवर्गीयांना डावललेल्या मुद्द्यावरही वडेट्टीवारांनी भाष्य केले. वाचा सविस्तर...

vijay wadettiwar
vijay wadettiwar

By

Published : Sep 12, 2021, 7:26 AM IST

नागपूर : देशात कशा पद्धतीने महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, याकडे लक्ष वेधण्याचे काम मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नागपूरच्या निवस्थानी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई साकीनाका घटनेवरून केंद्राकडे बोट दाखवले.

उत्तर प्रदेशमध्ये जाट महिलेवर अत्याचार होतो. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यातून पीडित महिला गायब होते. आरोपी गायब होतो? असा प्रश्न राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. 'मागील काही दिवसात महिला, लहान मुलीवर देशभरात अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात उघडीस आलेली ही थरकाप उडवणारी घटना विकृत आहे. त्यावर गृहमंत्री बोलले आहेत की कठोर कारवाई व्हावी. अत्याचाराचा घटना होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची गृहमंत्री वळसे पाटील यांनी भूमिका मांडली', असे वडेट्टीवार म्हणाले.

शरद पवारांच्या टिकेवर मवाळ भूमिका, चेंडू प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कोर्टात

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टिकेवर प्रश्न विचारला असता त्यांनी बोलणे टाळले. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जी भूमिका मांडली तशीच यांची काहीसी भूमिका दिसत आहे.

मेट्रो पद भरती संदर्भात मागासवर्गीय आयोगकडून चौकशी होणार?

मेट्रोसंदर्भात गरज पडेल त्यावेळी लोकप्रतिनिधींना घेऊन धडक देणार आहोत, असा इशारा वडेट्टीवार यांनीर दिला. 'ज्या पदभरती झाल्या आहेत. त्यांना काढता येणार नाहीत, कायद्याच्या अडचणी आहेत. पण एमडीशी बोलणं झाले आहे. मंत्रिमंडळात बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. अन्यथा विधिमंडळाची मागासवर्गीय समिती चौकशी करेल. या समितीकडून पद भरतीत मागासवर्गीय वर्गाला का डावलण्यात आले? यावर जाब विचारला जाईल आणि त्यात काही समोर आल्यास कारवाईस पात्र राहतील', असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. ते मेट्रो भरतीत मागासवर्गीय प्रवर्गाला डावललेल्या मुद्द्यावर बोलत होते.

'ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन शिक्षणाची गरज'

शाळा, कॉलेज बंद आहेत. त्यामुळे अनेक मुलं-मुली, तरुणाई ऑनलाईन माध्यमांच्या गेमच्या दुष्टचक्रात अडकली आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले, की 'मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्याच्या उजेडात आल्या आहेत. यामुळे 'खाली दिमाख म्हणजे शैतानका घर' अशी परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाली आहे. यामुळे ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन शिक्षणाची गरज आहे. ज्या पद्धतीने इतर देशाची तुलना करताना स्पर्धा वाढली आहे. यासोबतच जर तिसऱ्या लाट आल्यास आणखी परिस्थिती गंभीर होईल आणि तरुण मुलं आणखी नैराश्यात जातील, यामुळे यावर गंभीरपणे विचार करावा लागेल' अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे.

हेही वाचा -साकीनाका बलात्कार प्रकरण : एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details