महाराष्ट्र

maharashtra

नागपूरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ; महापौरांचे नियम पाळण्याचे आवाहन

नागपुरात दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. मोठे मॉल, इतर दुकाने, ब्रेकरी, भाजीपाला बाजार याठिकाणी लोकांचे लोंढेच्या लोंढे दिसतात. काही ठिकाणीतर नागरिक विना मास्क फिरताना दिसतात. त्यामळे शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापौर तिवारी यांनी दिला.

By

Published : Feb 22, 2021, 12:55 PM IST

Published : Feb 22, 2021, 12:55 PM IST

Updated : Feb 22, 2021, 2:18 PM IST

ETV Bharat / state

नागपूरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ; महापौरांचे नियम पाळण्याचे आवाहन

दयाशंकर तिवारी, महापौर नागपूर.
दयाशंकर तिवारी, महापौर नागपूर.

नागपूर- शहरात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी सुरक्षिततेच्या कारणास्तव पाचवी ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी स्वयंशिस्त लावून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही तिवारी यांनी केले आहे.

नागपूरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

नियम न पाळणाऱ्या शिकवण्या बंद करा
नागपूरात कोरोनाचे वाढते संकट पाहता शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश महापौर यांनी दिले आहेत. मात्र, नववी आणि दहावीच्या वर्गासाठी परीक्षा घेणे महत्वाचे असल्याने कोरोना नियमांचे पालन करत या परिक्षा घेण्यात याव्यात असे आदेश तिवारी यांनी शाळा आणि महाविद्यालयांना दिले आहेत. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात खासगी शिकवण्या चालतात. ज्या शिकवण्यांमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात नाही त्या शिकवण्या बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

नागपूरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

कर्मचाऱ्यांची संख्या कमी; सामान्य नागरिकांची गैरसोय
मनपाच्या कंट्रोल रुममधूम खाजगी आणि शासकीय रुग्णलायत रिक्त खाटांची माहिती दिली जाते. कोरोनाच्या लसीकरणासाठी संबंधित व्यक्तीला दूरध्वनीवरून माहिती दिली जाते. याचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी महापालिकेच्या कंट्रोल रुमला भेट दिली. मात्र, तिथे कर्मचाऱ्यांची संख्या अपूरी असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. त्यामुळे लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरुन सामान्य नागरिाकांची गैरसोय होणार नाही. यासोबत कोरोनाच्या काळात काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत घेतली होती. त्याच लोकांशी संपर्क करत त्यांचा सुद्धा पुन्हा सहभाग घेण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले.


काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर, आशा वर्कर जाणार घरोघरी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम करणारे पथक आहे. त्या त्यांची संख्या वाढवली पाहिजे. मागील वर्षात प्रकोप असताना ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन आशा वर्कर काम करत होत्या. पुन्हा त्यांच्या मदतीने प्रभावीत क्षेत्रात जाऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे निर्देश दिले आहे. कोरोनाचा रुग्ण सापडल्यावर एखाद्या रुगणाच्या घराजवळील चारही बाजुतील अधिक संपर्कात असणाऱ्या किमान 20 घरांवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे करण्यात येत होते. त्याच पद्धतीने ते पुन्हा आता आशा वर्करच्या मदतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाणार आहे.

नागपूरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ
शासन प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही...शहरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. मोठे मॉल, इतर दुकाने, ब्रेकरी, भाजीपाला बाजार याठिकाणी लोकांचे लोंढेच्या लोंढे दिसतात. काही ठिकाणीतर नागरिक विना मास्क फिरताना दिसतात. त्यामळे शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापौर तिवारी यांनी दिला. शासन प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त लाऊन शासनाच्या नियमांचे पालन करावे असेही तिवारी म्हणाले.
Last Updated : Feb 22, 2021, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details