महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यूपीएससीच्या मार्गदर्शनाच्या नावावर आयकर आयुक्तांकडून महिला डॉक्टरचे शारीरिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल - नागपूर बलात्कार न्यूज

नागपूरमध्ये यूपीएससीच्या मार्गदर्शनाच्या नावाखाली आयकर आयुक्तांनी महिला डॉक्टरचे शारीरिक शोषण केल्याचे समोर आले आहे. शिवाय, गर्भपातही करायला लावला, असा आरोप पीडितेने केला आहे. तर, पोलिसांनी याप्रकरणी आयकर आयुक्तांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

nagpur
नागपूर

By

Published : May 17, 2021, 8:35 PM IST

नागपूर -यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्याच्या नावाखाली एका आयकर आयुक्ताने महिला डॉक्टरचे शारीरिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे दोघांमध्ये संबंध होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी महिला डॉक्टर गर्भवती झाली होती. त्यानंतर आयकर आयुक्तांनी तिच्यावर दबाव टाकून बळजबरीने गर्भपात करायला लावला, असाही आरोप पीडित डॉक्टर महिलेने केला आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी सुथादिरा बालन या आयकर आयुक्ताविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.

आरोप लागलेले सुथादिरा बालन ३५ वर्षांचे आहेत. ते मूळचे पुद्दुचेरीचे राहणारे आहेत. काही महिन्यांपूर्वी ते आयकर विभागाच्या प्रशिक्षणासाठी नागपुरात आले होते. तेव्हा ते एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तिथेच सुथादिरा बालन यांची ओळख २८ वर्षीय पीडित डॉक्टर महिलेसोबत झाली होती. त्या महिला डॉक्टरला यूपीएससीची परीक्षा द्यायची होती. त्यामुळे तिने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून आयकर आयुक्त पद मिळवणाऱ्या सुथादिरांकडे मार्गदर्शन मागितले होते. यूपीएससीच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली आयकर आयुक्तांनी तिच्यासोबत सलगी वाढवली. तिला नागपूरजवळच्या खापरखेडा भागात एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला', अशी पीडित महिला डॉक्टरची तक्रार आहे.

एवढेच नाही तर आयकर आयुक्तांनी त्यांच्या पदाचा रुबाब दाखवत तिला गर्भपात करायला मजबूर केल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी सुरुवातीला पीडित महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी तक्रार द्यायला आली होती. मात्र, तेव्हा काही वेळाने तिने पोलिसांना तक्रार करायची नाही, असे सांगत घर गाठले होते. आता पुन्हा पीडित महिलेने तक्रार करण्याचे ठरवत खापरखेडा पोलीस ठाणे गाठले आणि रीतसर तक्रार दिली. तर, पोलिसांनी आवश्यक चौकशी केल्यानंतर महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून आयकर आयुक्त सुथादिरा बालन यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -Cyclone Tauktae : मुंबापुरीला चक्रीवादळाचा तडाखा.. मुसळधार पावसाने मुंबई 'स्लो ट्रॅक'वर

ABOUT THE AUTHOR

...view details