महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Crime: उपराजधानीत आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ, विविध घटनांमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक - मुलीची आर्थिक फसवणुक

आर्थिक प्रलोभने देऊन फसवणूकीचे केंद्र ठरत असलेल्या नागपुरात आर्थिक फसवणूकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांत तिघांची कोट्यवधी रुपयांनी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Nagpur News
कोट्यवधी रुपयांची फसवणूक

By

Published : Feb 24, 2023, 10:11 AM IST

नागपूरात विविध घटनांमध्ये अनेकांनी कोट्यावधी रुपयांनी फसवणूक

नागपूर: पहिली घटना प्रॉपर्टी व्यावसायिकाने दुसऱ्या व्यापाऱ्याला ३ कोटी १५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. १४ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या डुप्लेक्ससह इतर संपत्तीचे विक्रीपत्र करून देण्यास प्रॉपर्टी डीलर टाळाटाळ करत असल्यामुळे, फिर्यादीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी सचिन रामदास मित्तल आणि बालकिसन मोहनलाल गांधी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

३० लाख रूपये आरोपींना दिले: फिर्यादी राजेश रामस्वरूप सारडा यांनी निती गौरव कॉम्प्लेक्स, तिसरा माळा, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ येथे ग्लॅन्डस्टोन इंफ्रास्ट्रक्चरचे संचालक आरोपी सचिन रामदास मित्तल आणि बालकिसन मोहनलाल गांधी यांच्या कडुन डुप्लेक्स खरेदी करीता करार केला होता. प्रती डुप्लेक्स ३० लाख प्रमाणे, एकुण ३ डुप्लेक्स खरेदी बाबत ऍग्रिमेंट टु सेल केले होते. त्याकरीता प्रती डुप्लेक्स १० लाख प्रमाणे एकुण ३० लाख रूपये आरोपींना दिले होते. २४ महीने मुदतीत डुप्लेक्स देणार होते. आरोपींनी टाळाटाळ करून पैसे परत न करता फिर्यादीची फसवणुक केली.

आर्थिक फसवणुक केली: आरोपींनी ८ कोटी ११ लाख २१ हजार रूपयात मालमत्ता खरेदी केली होती. त्यापैकी आरोपींनी फिर्यादीस ५ कोटी २६ लाख २१ हजार रूपये दिले. उर्वरीत रक्कम २ कोटी ८५ लाख रुपये न देता फसवणुक केली. आरोपींनी संगणमत करून फिर्यादी कडुन जमीनीचे विक्रीपत्र करून घेवुन तसेच डुप्लेक्स मध्ये गुंतवलेली रक्कम किंव्हा ताबापत्र न देता फिर्यादीची एकुण ३ कोटी १५ लाख रूपयाची विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केली. अशी तक्रार फिर्यादी राजेश रामस्वरूप सारडा यांनी दिली आहे. त्याआधारे पोलीसांनी आरोपींच्या विरूध्द कलम ४०६, ४२०, ३४, भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदवुन पुढील तपास सुरू केला आहे.


२ कोटी ४५ लाखाने फसवणूक: फिर्यादी वर्षा विलास आगलावे व त्यांचे पती विलास आगलावे (मयत) यांना आरोपी निरंजन रावसाहेब निर्मल यांने सांगितले की, त्यांच्या वेगवेगळया कंपन्या आहेत. आरोपी रावसाहेब निर्मल, सौ. उषा रावसाहेब निर्मल,सौ. प्रितम निरंजन निर्मल सर्व रा. अहमदनगर हे त्यामध्ये डायरेक्टर आहेत. सदर कंपन्यांमध्ये गुंतवणुक केल्यास १ वर्षात व्याजासह डबल नफा मिळेल, असे सांगून फिर्यादीचे पतीला विश्वासात घेवून एकुण २ कोटी ४५ लाख रूपये घेतले होते. त्यापैकी आरोपींनी फिर्यादीस २० लाख रूपये परत करून उर्वरित २ कोटी २५ लाख रूपये परत न करता व नफा मिळवून न देता फिर्यादीची फसवणुक केली. याप्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.



क्रिप्टोकरन्सीच्या नावे फसवणूक : फिर्यादी चिंतामण नामदेराव नागपूरे यांची मुलगी तोषीका हि आय.टी कंपनीत जॉब करते. तिचे माबाईलवर व्हॉट्सअँप मॅसेज आला की युटूबवर मोठया ब्रॅन्डचे व्हिडीयो टाकतात त्या व्हिडीयोंना तुम्ही लाईक केले, तर तुम्हाला प्रत्येक लाईक केलेल्या व्हिडीयो करीता ५०/- रू देण्यात येईल यावरून फिर्यादीचे मुलीने लाईक केले. तेव्हा तिचे मोबाईल वर फोन पे द्वारे आरोपी ने ५०,१०० तसेच २०० रूपये पाठविले आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीचे मुलीस क्रिप्टोकरंसी मध्ये गुंतवणुकीचे फायदे सांगुन चांगल्या प्रॉफीटची हमी दिली. फिर्यादीचे मुलीने वेळोवेळी आरोपीला पैसे पाठविले. आरोपीने तिला एकुण ७ लाख १५ हजार रुपये ऑनलाईन माध्यमाने पाठविण्यास भाग पाडुन फिर्यादीचे मुलीची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशीअंती पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे आरोपी विरूध्द कलम ४२०, भादवि कलम ६६ (डी), आयटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहेत.



हेही वाचा:Thane Crime व्यापाऱ्याला दिले कोट्यवधीच्या नफ्याचे आमीष अन् लावला दीड कोटींचा चुना

ABOUT THE AUTHOR

...view details