नागपूर - नागपूरकर आता कोरोनामुक्त मार्गावर आहेत. कोरोनाची परिस्थिती दिवसगणीत सुधारत असताना नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकही मृत्यू नाही. अशी परिस्थिती या दुसऱ्या लाटेतील पहिलाच दिवस आहे. काही दिवसांपूर्वी एक मृत्यू झाला होता. नागपूर ग्रामीण भागात 14 तालुक्यात मागील 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद नाही हे चित्र मोठा दिलासा देणारे चित्र आहे.
10 हजार लोकांची चाचणी
शनिवारी कोरोनाबाबतचा अहवालात आला. त्यामध्ये 10 हजार 13 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 197 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरी भागात 123 तर, ग्रामीण भागातील केवळ 71 बाधित रुग्ण मिळून आले आहेत. तसेच 6 जण दगावले आहे. यामध्ये शहरी भागात 3, तर ग्रामीण भागात शून्य मृत्यूची नोंद आहे. जिल्हाबाहेरील 3 जण दगावले आहेत. तसेच 471 जणांपैकी शहरात 349 तर ग्रामीण 122 जण कोरोना मुक्त झाले आहेत. यात 1586 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून, 2 हजार 709 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.