महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात दोन दिवसात दोन नवविवाहितांचा त्यांच्या नवऱ्यांनी केला खून - Dipti Nagmoti murder Nagpur

नागपूरमध्ये खुनाच्या घटना होणे आता काही नवीन नाही. पण, गेल्या 48 तासात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे दोन्हीही नवविवाहित महिलांची हत्या त्यांच्याच पतीने केली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Feb 16, 2021, 8:35 PM IST

नागपूर - नागपूरमध्ये खुनाच्या घटना होणे आता काही नवीन नाही. पण, गेल्या 48 तासात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे दोन्हीही नवविवाहित महिलांची हत्या त्यांच्याच पतीने केली आहे. पहिली घटना ही हिंगणा परिसरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल घडली होती, तर आज पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कापसी भागात सुद्धा एका नवऱ्याने आपल्या बायकोला संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

माहिती देताना पारडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गांजुर्डे

हेही वाचा -सभापती निवडणूक : 10 पैकी 9 झोनमध्ये भाजपचे मिनी महापौर, तर एका ठिकाणी बसपचा विजय

पहिली घटना -

पहिली घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगरच्या इसासनी भागात घडली आहे. अनैतिक संबंधांमुळे निर्माण झालेल्या वादातून नवऱ्याने बायकोचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणातील मृतक दिप्ती अरविंद नागमोती आणि आरोपी नागमोती यांचे लग्न ५ जानेवारी रोजी म्हणजे सुमारे सव्वा महिन्यांपूर्वी झाले होते. ते नव्यानेच इसासनी भागात राहायला आल्याने त्यांना शेजारचे देखील ओळखत नव्हते. आरोपी अरविंद हा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत वेल्डिंगचे काम करायचा. दिप्तीचा खून केल्यानंतर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

दुसरी घटना -

दुसरी घटना पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. ज्या महिलेचा खून झाला तिचे लग्न चार महिन्यांपूर्वीच झाले होते. तिचा खून देखील तिच्या नवऱ्याने केल्याचा खुलासा झाला आहे. मृतक महिलेचे नाव ज्योती मारखडे असे आहे, तर तिच्या नवऱ्याचे नाव ललित मारखडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्योती आणि ललितचे लग्न तीन महिन्यांपूर्वी झाले होते. ते दोघेही एका आरा मशीनच्या कारखान्यात कामाला होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र, त्यानंतर सर्व सुरळीत सुरू असताना रात्री ललितने ज्योती झोपलेली असताना तिच्या डोक्यावर लाकडाने वार करून तिचा खून केला. घटनेची माहिती समजताच पारडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी ललितला अटक केली आहे.

हेही वाचा -खर्याच्या व्यसनावरून घटस्पोट दिला जाऊ शकत नाही; नागपूर खंडपीठाचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details