नागपूर -नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकून एका वारंगणेसह कुंठखाना संचालकाला अटक केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा कुंठखाना शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतिशय उच्चभ्रू अशा वस्तीत सुरू होता. पोलिसांना घटनास्थळाहून बनावट चहापत्ती आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा हाती लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमित लालवाणी (वय ३८) यास अटक केली आहे. त्याला आधी देखील चोरी आणि जुगाराच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अटक केली होती.
माहिती देताना पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे हेही वाचा -आमदार मेघे यांच्या नेतृत्वात आरोग्य केंद्राच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषदेसमोर ठिया आंदोलन
जरीपटका परिसरातील नारा घाटाजवळ अमित लालवाणी नावाचा आरोपी कुंठखाना चालवत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तयार केलेल्या बनावट ग्राहकाने आरोपी अमित सोबत संपर्क केला. ठरल्यानुसार अमित त्या ग्राहकाला पॉश अशा कुंठखान्यात घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांच्या त्या खबऱ्याने इशारा करताच एसएसबीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी धाड टाकून एका वारंगणेसह दलालाला अटक केली.
तसेच, वेशाव्यवसाय सुरू असलेल्या इमारतीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट चहापत्ती आणि सुगंधित तंबाखूचा मोठा अवैध साठा आढळून आला. पोलिसांनी या संदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागाला सूचना दिली. त्यानंतर एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
हेही वाचा -कड्याक्याच्या थंडीमुळे विदर्भ गारठला; पुढील चार दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता