महाराष्ट्र

maharashtra

Nagpur Metro Railway Travel Discount: प्रवाश्यांसाठी नागपूर मेट्रोची नवी योजना; शनिवार आणि रविवार मिळणार ३० टक्के डिस्काउंट

By

Published : Mar 3, 2023, 10:59 PM IST

महामेट्रोने तिकिटांच्या दरात तीनदा मोठी वाढ केल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. त्याचा थेट परिणाम प्रवासी संख्येवर होताना दिसत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नुकतीच मेट्रो प्रवाशांसाठी डेली पासची सुविधा उपलब्ध सुरू केली. यानंतर आता आणखी एक सुविधा मेट्रो प्रवाश्याना देत आहे. येत्या शनिवार पासून सर्व मेट्रो प्रवाश्याना मेट्रो प्रवासाच्या तिकिटावर 30 टक्के वीकेंड डिस्काउंट देणार आहे. या सुविधेची सवलत फक्त शनिवार आणि रविवारी या दिवशी लागू होईल.

Nagpur Metro Railway Travel Discount
नागपूर मेट्रो रेल्वे

नागपूर:महामेट्रो प्रशासनाच्यानवीन धोरणानुसार, तिकिटांव्यतिरिक्त प्रवासासाठी महाकार्ड वापरणारे प्रवासीसुद्धा या सवलतीसाठी पात्र ठरतील. प्रत्येक व्यवहार हा रोखीने किंवा महा कार्डद्वारे जो शनिवार आणि रविवारी केला जातो तो सामान्य भाड्याच्या तुलनेंत 30 टक्के दराने सवलत असेल. कार्डवर कोणत्याही प्रकारचे विशेष पास लोड न करता प्रवासी त्यांचे विद्यमान महाकार्ड थेट स्वयंचलित गेट्सवर वापरू शकतात.


मेट्रो प्रवाश्यांच्या जीवनाचा भाग: जानेवारीत तीन वेळा तिकीट दरवाढ: स्वस्त, सुखकर आणि आरामदायी प्रवासाचे उपयुक्त साधन म्हणून पुढे आलेली नागपूर मेट्रो हळूहळू नागपूरकरांच्या रोजच्या जीवनाचा भाग होऊ पाहत असताना गेल्या महिनाभरात सलग तीन वेळा तिकीट दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातुन संताप व्यक्त होत आहे. जानेवारी महिन्याच्या 30 दिवसात तीनवेळा तिकिटांची दरवाढ करण्यात आली होती. आधी शहरातील एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी 20 रुपये मोजावे लागायचे मात्र, आता 20 ऐवजी 41 रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे.

पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत: उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रो सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांना पदवी स्तरापर्यंत 30 टक्के सवलत प्रदान करत आहे . याचा लाभ विविध आयटीआय किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. या योजनेअंतर्गत, एक प्रवाशी 100 रुपयांमध्ये डेली पास खरेदी करू शकतो. याचा फायदा असा की, प्रवाशी कोणत्याही दिवशी नागपूर मेट्रो प्रकल्पात अमर्यादित प्रवास करू शकतो. प्रवाशांना विकेंडला खूप कमी किमतीत आणि डिस्काउंटवर प्रवास करता यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

प्रवाश्यांसाठी सायकलिंगची सुविधा: गेल्या काही वर्षांत उपराजधानी नागपूर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. वाढत्या जनसंख्येसोबत वाहनाची संख्या ही प्रदूषण वाढवत असल्याने शहरासाठी घातक ठरत आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नातून इतर मोठ्या शहरांना मागे टाकत उपराजधानी नागपूरला महामेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने मेट्रो शहर म्हणून उदयास येत आहे. शहराच्या चारही बाजूने मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यासोबतच नागरिकांनी अधिक सुविधा देण्यासाठी मेट्रोकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. यातूनच प्रवाशांसाठी सायकल व ई-बाईक पुरविण्याची संकल्पना राबवत लोकांना घरापासून मेट्रोपर्यंत आणि मेट्रोपासून गंतव्यापर्यंत पोहोचता येणार आहे.

हेही वाचा:Sonia Gandhi Hospitalized: सोनिया गांधी आजारी, दिल्लीतील रुग्णालयात केले दाखल.. डॉक्टर म्हणाले, 'परिस्थिती..'

ABOUT THE AUTHOR

...view details