महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर जिल्हा परिषदेसोबतच काँग्रेसचे मिशन महानगरपालिका.. - congress

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात असून सध्या जिल्हा परिषदे सोबतच मनपा निवडणुकीची तयारीही काँग्रेसकडून केली जात आहे.

nagpur
नागपूर महानगरपालिका

By

Published : Dec 25, 2019, 1:27 PM IST

नागपूर - जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असून सर्व राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महापालिकेत भाजपची सत्ता येवू नये, याकरिता काँग्रेसने कंबर कसली आहे.

तानाजी वनवे, विरोधी पक्षनेता मनपा

विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित यश आल्यानंतर राज्यात सत्ता स्थापना झाली. त्यात राज्यातील सत्तेत काँग्रेसचा वाटा असतांना तोंडावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपला पराभूत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदे सोबतच मनपा निवडणुकीची तयारीही काँग्रेसकडून केली जात आहे.

हेही वाचा - नागपुरात नाताळचा उत्साह शिगेला; ख्रिस्ती बांधवांनी दिल्या शुभेच्छा

नागपूरला भाजपचा गड मानले जात होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आणि उत्तर नागपुरातून नितीन राऊत विजयी झालेत. त्यामुळे आता नागपूर मनपावर कमळ फुलणार नाही याचा देखील पूर्ण प्रयत्न केला जात आहे. याकरिता शहरातील विधासभा निहाय प्रभागात मोर्चे बांधणीची तयारी केली जात आहे.

हेही वाचा - सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घुमजाव

ABOUT THE AUTHOR

...view details