नागपूर- कडक निर्बंधांच्या नावावर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने व्यापारी रस्त्यावर उतरले आहे. यातच नागपुरात भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने हातात फलक घेऊन व्यापारी वर्गा सोबत उभे राहून आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी आमदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. इतवारी परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जामवबंदीचे सर्रास उल्लंघन होताना दिसून आले.
यावेळी सुरुवातीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा दोन दिवसांचा विकेंड लाकडाऊन करण्यात येणार असल्याने याला होकार दिला होता. पण, प्रत्यक्षात ही कडक निर्बंध म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यांचा फटका लहान व्यापारी वर्गाला बसला आहे. यामुळे व्यापारी संतप्त झाले आहे.
यामुळे भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनी लॉकडाऊनवर भाजपची भूमिका स्पष्ट करतांना एकीकडे कन्स्ट्रक्शन साईट, निर्माण कंपन्या सुरू आहे. काही व्यापार सुरू राहील मग बाकी दुकाने बंद का, असा सवाल केला. करायचे असल्यास पूर्ण बंद करा. अन्यथा ऑड-इव्हन पद्धतीचा अवलंब करा जेणेकरून एक दिवस एका बाजारपेठ दुसऱ्या दिवशी दुसरी बाजारोपेठ सुरू ठेवता येईल व बाजारात गर्दी होणार नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.