नागपूर - नागपुरात रुग्णसंख्या मागील तीन ते चार दिवसांत हजार ते पंधराशेच्या जवळपास स्थिरावली आहे. एप्रिल महिन्यात हजारोंच्या संख्येने रुग्ण उच्चांक गाठत होते. या महिन्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट झाली आहे. यामुळे बाधितांच्या तुलनेत अधिक लोक बरे होत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मागील 24 तासांत 1151 बाधितांची नोंद झाली असतांना आज 3405 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याची संख्या वाढली असून हे प्रमाण 94.03 टक्के एवढे आहे.
नागपुरात कोरोनाचे1151 नवे बाधित, तर 3405 कोरोनामुक्त - 1151 नविन बाधितांची नोंद
पूर्व विदर्भात 2 हजार 607 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याची संख्या वाढली असून हे प्रमाण 94.03 टक्के एवढे आहे. मागील 24 तासांत 1151 बाधितांची नोंद झाली असतांना आज 3405 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.
1 हजार 151 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह-
जिल्ह्यात गुरुवारी 19 हजार 217 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली.यामध्ये एकूण 1 हजार 151 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शहरी भागात 562 तर ग्रामीण भागातील 578 बाधित रुग्ण आढळले आहेत.तसेच 28 रुग्णांचा नागपूर जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे.शहरी भागात 9 ग्रामीण भागात 8 तर जिल्ह्याबाहेरील 11 जण हे कोरोनासाथीने दगावले आहेत. 3 हजार 405 जण कोरोनामुक्त झाले आहे. रुग्णसंख्येत घट होऊन 19 हजार 246 वर पोहोचली आहे.आतापर्यंत 4 लाख 67 हजार 931 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यातून 4 लाख 36 हजार 222 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये मृत्यूचा आकडा हा 8685 वर जाऊन पोहचला आहे.
पूर्व विदर्भात 2 हजार 607 रूग्ण हे कोरोनामुक्त-
पूर्व विदर्भात 2 हजार 607 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. 6 हजार 396 रुग्ण नव्याने कोरोनाबाधित आढळले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 72 जण हे कोरोना संसर्गाने दगावले आहेत. यात बाधितांच्या तुलेनेत 3 हजार 789 अधिक रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहेत.आज रूग्ण संख्येत आणखी घट होत असल्याचे आढळले.आज 8.32 इतका पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या दरात घट होत आहे.
हेही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर; थोड्याच वेळात रत्नागिरीत होणार दाखल