महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात गुन्हेगारांचा उच्छाद, अवघ्या १२ तासात २ खून - chetan metangale murder nagpur

दोन दिवसांपूर्वी गाडी पार्किंगच्या विषयावरून चेतनचा एका विधी संघर्ष आरोपीसोबत वाद झाला होता. त्यावेळी आरोपीने त्याला बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काल रात्री चेतन हा उदय नगर परिसरातील गार्डनजवळ आला असता मुख्य आरोपीसह ५ आरोपींनी चेतनवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला.

चेतन मेंटागळे
चेतन मेंटागळे

By

Published : Aug 16, 2020, 5:31 PM IST

नागपूर- उपराजधानी नागपुरात अवघ्या १२ तासात २ खुनाच्या घटना घडल्या आहेत. काल (१५ ऑगस्ट) रात्री हुडकेश्वर येथील उदय नगर परिसरात एका तरुणाचा निघृण खून करण्यात आला. तर, आज काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी कुऱ्हाडीने वार करून ठार केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन मेंटागळे (रा. नरखेड, ता. सावरगाव) हा मानेवाडा परिसरातील लाडीकर लेआऊटमध्ये भाड्याच्या घरात राहात होता. दोन दिवसांपूर्वी गाडी पार्किंगच्या विषयावरून त्याचा एका विधी संघर्ष आरोपीसोबत वाद झाला होता. त्यावेळी आरोपीने त्याला बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काल रात्री चेतन हा उदय नगर परिसरातील गार्डनजवळ आला असता मुख्य आरोपीसह पाच आरोपींनी चेतनवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन विधीसंघर्ष अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे, हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकमल वाघमारे यांनी सांगितले.

माहिती देताना हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकमल वाघमारे

तर आज काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. गड्डीगोदाम परिसरातील भारत टॉकिज जवळ देवा उसरे यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी कुऱ्हाडीने वार करत त्यांचा खून केला. त्यामुळे, नागपुरात आटोक्यात आलेली गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा-नागपूरसह ग्रामीण भागातील कोरोना मृत्यू दर कमी करा, आरोग्य राज्यमंत्र्यांच्या सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details