नागपूरच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक, भक्त गहिवरले - बाप्पाला निरोप
10 दिवसांची सेवा घडल्यानंतर गणेश भक्त जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देताना दिसले. यावेळी भक्तांना गहिवरून आल्याचे चित्र आज नागपुरात पाहायला मिळाले
नागपूरच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक
नागपूर- 10 दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जात आहे. 10 दिवसांची सेवा घडल्यानंतर गणेश भक्त जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देताना दिसले. यावेळी भक्तांना गहिवरून आल्याचे चित्र आज नागपुरात पाहायला मिळाले. नागपुरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक निघाली आहे. यावेळी बाप्पाला निरोप देताना भक्तांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी.