नागपूर- ग्राहकांच्या सोयीनुसार कधीही आणि कुठेही उपलब्ध होत असलेल्या झूम कारचा वापर दारू तस्करीसाठी होत आल्याची घटना समोर आली आहे. नागपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुप्त माहितीच्या आधारे झूम कारवर कारवाई करत नागपूरवरून गडचिरोली येथे जाणारा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
नागपुरात दारू तस्करीचा नवा फंडा, झूम कारमधून गडचिरोलीला जाणारा मद्यसाठा जप्त - Alcohol Smuggling Nagpur Gadchiroli News
दारू तस्करांनी यावेळी चक्क झूम कार भाड्याने घेऊन त्यातून दारू तस्करीचा प्रयत्न केला आहे. पण, अबकारी विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून हा प्रकार लपू शकला नाही. अबकारी विभागाने गुप्त माहितीच्या आधारे नागपूरवरून गडचिरोलीला जाणारी झूम कार थांबवली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारू साठा आढळून आला.

पोलिसांची नजर चुकविण्यासाठी दारू तस्करांनी एक नवी शक्कल लढवली आहे, ज्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पोलीस विभागाचे डोके चक्रावले आहे. दारू तस्करांनी यावेळी चक्क झूम कार भाड्याने घेऊन त्यातून दारू तस्करीचा प्रयत्न केला आहे. पण, अबकारी विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून हा प्रकार लपू शकला नाही. अबकारी विभागाने गुप्त माहितीच्या आधारे नागपूरवरून गडचिरोलीला जाणारी झूम कार थांबवली असता, त्यात मोठ्या प्रमाणात दारू साठा आढळून आला. ज्यामध्ये विदेशी मद्य ज्याची किंमत ३३ हजार ६०० रुपये एवढी आहे तिचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर, १० लाख रुपये किमतीचे वाहन, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सक्करदरा पोलीस स्थानक परिसरातील दिघोरी परिसरात करण्यात आली आहे.
हेही वाचा-नागपूर महानगरपालिकेत तोडफोडप्रकरणी बंटी शेळकेवर गुन्ह दाखल