नागपूर- शहरातील नागार्जुन कॉलनी येथून विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.
नागपूर : लाखोंचा अवैध मद्यासाठा जप्त,एकाला अटक - नागार्जुन कॉलनी
नारी परिसरातील नागार्जुन कॉलनी येथे मध्यप्रदेश निर्मित दारू आणि विदेशी दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने त्याठिकाणी छापा टाकला.
नारी परिसरातील नागार्जुन कॉलनी येथे मध्यप्रदेश निर्मित दारू आणि विदेशी दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी छापा टाकला असता महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या दारूचा साठा आढळून आला. मद्यसाठा आणि दारू तस्करीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. भरारी पथकाने एकाला अटक केली असून अन्य आरोपी फरार झाले आहेत. तसेच आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.