महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गावातील तरुणांना मारहाण केल्याने संताप्त महिलांनी जाळल्या अवैध दारू विक्रेत्यांच्या गाड्या

अनेक गावांमध्ये सर्रासपणे अवैध दारूविक्री होते. काहीवेळा गावातील महिला याविरोधात आवाजही उठवतात. मात्र, हे विक्रेते त्यांना जुमानत नाहीत. अशीच घटना नागपूरमधील येरला गावात घडली. मात्र, संतप्त महिलांनी दारू विक्रेत्यांच्या गाड्याच जाळून टाकल्या.

bikes
गाड्या

By

Published : Jan 19, 2021, 11:09 AM IST

नागपूर - अवैध दारू विक्रेत्यांनी गावातील दोन तरुणांना मारहाण केल्यानंतर गावातील महिलांनी अवैध दारू विक्रेत्यांची वाहने जाळली. त्यानंतर अड्ड्यातून अवैध दारू साठा जप्त केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येरला गावात घडली. रविवारी रात्री हा प्रकार झाला.

येरला गावात महिलांची ग्रामसभा

अनेक दिवसांपासून सुरू होती दारू विक्री -

येरला गावात गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. ही विक्री थांबवण्यासाठी महिलांनी अनेकदा मागणी केली होती. मात्र, त्यांनी या महिलांची विनंती न ऐकता आपला धंदा सुरूच ठेवला होता. त्यामुळे महिलांनी त्यांच्या अवैध धंद्याच्या परिसरात गस्त सुरू केली होती. अवैध दारू विक्रेते गावकाऱ्यांवर चिडून होते. रात्री दारूविक्रेत्यांनी किरकोळ कारणावरून गावातील दोन तरुणांना मारहाण केली. हातात तलवारी, लोखंडी रॉड घेऊन गावातील रस्त्यांवर धुमाकूळ केला. त्यानंतर चिडलेल्या महिलांनी एकत्र येत अवैध दारू अड्ड्यावर मोर्चा खोलला. दारू विक्रेत्यांना मारहाण केल्याने विक्रेते पळून गेले. त्यानंतर महिलांनी त्यांच्या सहा दुचाकी जाळून टाकल्या.

घटनेनंतर काल दिवसभर गावात होते तणावाचे वातावरण -

या घटनेनंतर येरला गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गावात बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी दोन तरुणांना मारहाण केल्या प्रकरणी गोलू वर्मा, आनंद वर्मा, अमिनेश वर्मा आणि त्यांचे तीन ते चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सर्व आरोपी सध्या फरार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details