नागपूर- अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने धाड टाकून निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली सुपारी 39 हजार 213 किलो इतकी असून त्याचा बाजारभाव 1 कोटी 47 लाख रुपये असल्याचे समजले आहे.
नागपुरात आरोग्याला हानिकारक असलेल्या सडक्या सुपारीचा मोठा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - Illegal betel nut seized nagpur
नागपूर शहरात काही व्यावसायिकांकडून कमी दर्जाची आणि खाण्यास अयोग्य असलेल्या सुपारीची सर्रास विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला समजली होती. या माहितीच्या आधारे इंडो आर्य सेंट्रल लिमिटेड या कंपनीच्या वडधामना येथील गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने धाड टाकून 39 हजार 213 किलो सुपारीचा साठा जप्त केला.

Seized betel nut Nagpur
नागपूर शहरात काही व्यावसायिकांकडून कमी दर्जाची आणि खाण्यास अयोग्य असलेल्या सुपारीची सर्रास विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला समजली होती. या माहितीच्या आधारे इंडो आर्य सेंट्रल लिमिटेड या कंपनीच्या वडधामना येथील गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने धाड टाकून 39 हजार 213 किलो सुपारीचा साठा जप्त केला आहे. या घटनेनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी सुरू असताना देखील सडक्या सुपारीचा धंदा तेजीत असल्याचे देखील समोर आले आहे.