महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Holi 2023 : होळी साजरी करताना गडबड कराल तर थेट जेलची हवा खावी लागेल - disturbance during the celebration of Holi

होळीचा उत्सव विशेषतः धुळवड शांततेत पार पडावी, याकरिता नागपूर शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. रंगपंचमी दरम्यान शहरात गोंधळ घालणाऱ्यांसह महिलांना जोर-जबरदस्तीने रंग लावण्याऱ्यांची थेट रवानगी पोलीस स्टेशनच्या लॉक-अपमध्ये केली जाईल, असा इशारा शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.

Nagpur CP Warning On Holi
पोलीस आयुक्तांची तंबी

By

Published : Mar 5, 2023, 7:30 PM IST

Updated : Mar 5, 2023, 7:49 PM IST

नागपूरचे सीपी अमितेशकुमार यांची होळीच्या पर्वावर गुन्हेगारांना तंबी

नागपूर:होळी निमित्ताने शहरात दोन ते तीन दिवस तगडा पोलीस बंदोबस्ताचे नियोजन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक देखील झालेली आहे. याशिवाय शांतता कमिटी बैठका देखील घेण्यात येत असल्याची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

खबरदार गोंधळ घालाल तर: नागपूर शहरात अंदाजे 40 ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. तिथे नाकाबंदी करून ड्रंकन ड्राईव्हची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज संध्याकाळ पासून तर 8 मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या व्यतिरिक्त 60 ठिकाणे जी संवेदनशील आहेत, त्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. इथे देखील ड्रंकन ड्राईव्ह मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. आजपासून शहरातील वेगवेगळ्या स्लम भागात आणि गुन्हेगारीचे हॉट स्पॉट आहेत. तिथे कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. एवढेच नाही तर पेट्रोलिंग मोबाईल युनिट सक्रिय करण्यात आले आहे. एकंदरीत सर्व एरिया डॉमिनेशन करण्यासाठी फ्लाग मार्च शहरातच्या वेगवेगळे भागात घेण्याची पोलिसांची योजना आहे. पूर्ण पोलीस दल या मोठ्या बंदोबस्तासाठी तयार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कायदा हातात घेतला तर :विशेषतः होळीच्या दरम्यान गेल्या दहा वर्षात 38 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये गोंधळ घालणे, महिलांसोबत अश्लील चाळे करण्याऱ्यांवर कलम 151/3 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. जर सण उत्सवाच्या काळात कोणी कायदा हातात घेणार असेल तर पुढच्या काळात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस तत्पर असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.

अंमली पदार्थ विक्रेत्यांवर विशेष लक्ष :ऑपरेशन नार्को फ्लॅश आउट अंतर्गत अंमली पदार्थ विक्रेत्यांवर विशेष पोलिसांचे लक्ष आहे. होळी रंगपंचमीच्या उत्सवात नशाखोरी मोठ्या प्रमाणात होते. त्या पार्श्वभूमीवर शहरात ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांची मोठी खेप येणार असल्याची माहिती मिळताचे नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आता पर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींकडून तब्बल ०१ किलो ९११ ग्राम मेफेड्रोन (MD) ड्रग्स जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत २ कोटी रुपये आहे. ऑपरेशन नार्को फ्लॅश आउट मोहीमेअंतर्गत नागपूर शहरात गांजा, ड्रग्स, चरस आणि ब्राऊन शुगरच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.


हेही वाचा:HSC Maths Paper Leaked : बारावीच्या कॉपीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा

Last Updated : Mar 5, 2023, 7:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details