महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गृह खाते राष्ट्रवादीला मिळाल्यास महिलांवरील अत्याचारास आळा घालू' - राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर

आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांचा कायद्यावर वचक होता. यावेळी देखील गृहमंत्रीपद जर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले तर महिलांवरील अत्याचाराला नक्की आळा घालू असे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी नागपूरच्या अध्यक्षा अलका कांबळे म्हणाल्या.

अलका कांबळे
अलका कांबळे

By

Published : Dec 25, 2019, 7:18 PM IST

नागपूर - गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले तर महिलांवरील अत्याचाराला आळा बसेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी नागपूरच्या अध्यक्षा अलका कांबळे यांनी व्यक्त केले. मनुस्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.

नागपुरमध्ये मनुस्मृती दहन


आर. आर. पाटील गृहमंत्री असतांना त्यांचा कायद्यावर वचक होता. त्यावेळी महिलांवर अत्याचाराचे प्रमाणही कमी होते. यावेळी देखील गृहमंत्रीपद जर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले तर महिलांवरील अत्याचाराला नक्की आळा घालू असे, अलका कांबळे म्हणाल्या.

हेही वाचा - नागपुरात नाताळचा उत्साह शिगेला; ख्रिस्ती बांधवांनी दिल्या शुभेच्छा

मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयी वाईट लिहलेले होते. म्हणून २५ डिसेंबर या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. या दिवसाचे औचित्यसाधून नागपूरमध्ये मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details