नागपूर -मला घाबरू नका, प्रामाणिकपणे कामे करा, बैठकांना वेळेवर या, नियमांचे कोटेकोर पालन करा, अशा सूचना आज नागपूरचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार आज (दि. 28 जानेवारी) सकाळी साडेनऊ वाजता स्वीकारला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
तुकाराम मुंढे यांच्या कामाची पद्धत, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, वेळेला महत्त्व देणे, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करणे या स्वभावामुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. बैठक संपल्यानंतर मेट्रोच्या लोकार्पण सोहळा असल्याने त्या कार्यक्रमाला ते निघून गेले.