महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या मंत्र्यांची खाती निश्चित; उर्जा खात्याविषयी काय म्हणाले नितीन राऊत? - Minister Nitin Raut ministorial allocation reaction

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन महिना लोटला आहे. मात्र, अद्यापही मंत्र्यांना खाते वाटप झालेले नाहीत. कधी काँग्रेसच्या नेत्यांची यादी अंतिम झालेली नाही. तर, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे कारण दिले जाते. असे असले तरी कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना ऊर्जा खाते मिळाल्याचे आता निश्चित झाले आहे.

nagpur
नितीन राऊत

By

Published : Jan 4, 2020, 9:44 PM IST

नागपूर- काँग्रेसच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेल्या नितीन राऊत यांना ऊर्जा खात्याचा पदभार मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. या संदर्भात स्वतः च नितीन राऊत यांनीच दुजोरा दिला आहे. आता केवळ या संदर्भात घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे.

प्रतिक्रिया देताना मत्री नितीन राऊत

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन महिना लोटला आहे. मात्र, अद्यापही मंत्र्यांना खाते वाटप झालेले नाहीत. कधी काँग्रेसच्या नेत्यांची यादी अंतिम झालेली नाही. तर, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे कारण दिले जाते. असे असले तरी कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना ऊर्जा खाते मिळाल्याचे आता निश्चित झाले आहे. या संदर्भात नितीन राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, जर मुख्यमंत्री मला ऊर्जा खाते देणार असतील तर याचा मला नक्कीच आंनद होईल. ऊर्जा खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर भार नियमनाचे प्रश्न सोडविण्याला माझी प्राथमिकता असेल, असे त्यांनी नमूद केले. ऊर्जा क्षेत्रात इतरही प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-निवडणूक शपथ पत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

ABOUT THE AUTHOR

...view details