महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

The Desperate Thief : 'मी काहीही चोरेले नाही.. तुम्हीच भिकारी' हताश चोराचा संताप व्यक्त करून पोबारा - Breaking the lock of the house at midnight

एका चोरट्याने बंद घरात चोरीचा बेत आखला, मध्यरात्री घराचे कुलूप तोडून प्रवेश (Breaking the lock of the house at midnight) केला. घरात पैसा-अडका, महागडे आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्याची त्याचा हेतू होता,मात्र त्याला घरात तीन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त काहीही न सापडल्याने तो चिडला आणि एका कागदावर चक्क 'मी घरातील काहीही चोरेलेलं नाही भिकारी' ('I did not steal anything, you beggar' ) असे लिहून आपला संताप व्यक्त करत पळ (The desperate thief ran away expressing anger) काढल्याची घटना उघडकीस आली आहे.

The Desperate Thief
चोराचा संताप

By

Published : Feb 26, 2022, 6:01 PM IST

नागपूर:पोलिसांच्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राहणारे एक कुटुंब 20 तारखेला देव-दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. 23 तारखेला ये कुटुंब घरी परत आल्यानंतर घराचे दार उघडे दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसून आले, त्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान एक कागद त्यांच्या नजरेस पडला त्यावर लिहिलेला मजकूर वाचून त्या कुटुंबाला धक्काच बसला, लिहिलेल्या मजकुरावर हसावे की रडावे अशी अवस्था त्यांची झाली होती.

चोराचा संताप



मी काहीही चोरेलं नाही, भिकारी'
चोराने मोठ्या मेहनतीने चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश मिळवला होता, मात्र घरात तीन हजार रुपयां शिवाय काहीही न सापडल्याने चिडलेल्या चोराने एका कागदावर 'मी घरातील काहीही चोरेलेलं नाही भिकारी' असे लिहून पोबारा केला आहे. त्या कुटुंबाच्या तक्रारींवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details