नागपूर - हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे आज (शुक्रवारी) पहाटे एन्काऊंटर करण्यात आले आहे. त्यावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरातील तरुणांनी देखील हैदराबाद पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे समर्थन केले आहे. हैदराबाद येथील घटनेची निंदा शब्दात करणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया या तरुणाईने 'ईटीव्ही भारत'ला दिली.
न्यायप्रणाली वेळ काढू असल्याने अनेकांना न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्ष वाट बघावी लागते. त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपींचे एन्काऊंटर केल्याने पीडित दिशा यांना झटपट न्याय मिळाला आणि खरी श्रद्धांजली मिळाली असेही या मत त्यांनी व्यक्त केले.