नागपूर-शहरातील विठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही हत्येनंतर आरोपी पतीने पत्नीच्या बेपत्ता झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात तो उघडा पडला. हंसा पटेल असे त्या मृत पत्नीचे नाव असून युवराज पटेल असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या - पतीकडून पत्नीची हत्या नागपूर
आरोपी युवराजला पत्नीचे कंत्राटदारासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे चिडलेल्या युवराजने हंसाला वाठोड्यातील चांदमारी भागात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिचा गळा आवळून खून केला.
हत्येनंतर पत्नीच्या बेपत्ता झाल्याचा बनाव
अनैतिक संबंधाच्या संशयावरून युुवराजने हंसाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने वाठोडा भागातील झुडपात मृतदेह लपवून ठेवला आणि स्वतः वाठोडा पोलीस स्टेशन गाठून पत्नी हरविल्याची तक्रार दिली. मंगळवारी हंसा यांचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी संशयाच्या आधारे युवराजची कसून चौकशी केली. त्यात युवराजने हंसाचा खून केल्याचे कबूल केले.
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून खून
आरोपी युवराजला पत्नीचे कंत्राटदारासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे चिडलेल्या युवराजने हंसाला वाठोड्यातील चांदमारी भागात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर युवराजने हंसाचा मृतदेह चांदमारी येथील झुडपात लपवून ठेवला. मात्र, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने तपास करून आरोपीला अटक केली आहे.