नागपूर -राज्य सरकार एका बाजूला लस खरेदी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने अनेक दिवसांपूर्वी मागितलेली परवानगी देत नाही. सर्वात आधी नागपूर महानगरपालिकेने परवानगी मागितल्यानंतर परवानगी देता येणार नाही असे अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. मग दुसर्या बाजूला मुंबई महापालिकेला एक कोटी लस खरेदी करण्याची परवानगी कोणत्या आधारे देण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारने खुलासा करावा तसेच राज्य सरकार नागपूरसोबत दुजाभाव का करत आहे असा आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर कसे -
उपराजधानी नागपूर येथील लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळावी. या उद्देशाने काही दिवसांपूर्वी नागपूरचे महापौर दया शंकर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लस खरेदी करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी एक पत्र लिहिले होते. लस कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना परस्पर खरेदी करता येणार नसल्याचं उत्तर मिळाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढल्याने यावर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दटके यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
राजकारण न करता मुख्यमंत्र्यांनी नागपूरला परवानगी द्यावी -