नागपूर - गरिबांसाठी बांधून ठेवलेले घरकुल वाटप न झाल्याने त्याचा उपयोग अवैध दारू साठवण्यासाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नगर पालिकेने उभारलेल्या घरकुलात 435 लिटर मोहा दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्तपादन शुल्क विभागाने कारवाई केली असून यात मात्र स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन आहे. पोलीस स्टेशनपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हे घरकुल आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला दुधाळा रोडवर नगरपालिकेच्या वापरात नसलेल्या घरकुलाचा उपयोग दारूच्या अवैध धंद्याकरिता केला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन छापा टाकला असताना 435 लिटर मोहाची दारू मिळून आली. दारू निर्मितीच्या साहित्यासह 38 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम 65 इ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात सुनील चोखी यादव या आरोपीस अटक करण्यात आली आहे.