नागपूर -भारतीय संस्कृतीत लग्नाच्या संकल्पनेला फार महत्व आहे. आयुष्याच्या ठराविक वळणावर लग्न केले जाते. मात्र ज्यांचं या जगात कुणीही नाही असे अनेक तरुण, तरुणी आपल्या समाजात आहेत. त्यातही ज्यांच्या शरीरात व्यंग आहे, अशा लोकांसाठी तर समाजातील परिस्थिती फारच कठीण आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील वझ्झर येथील समाजसेवक शंकरबाबा पापडकर हे अशा तरुणांसाठी मोठा आधार म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी अनेकांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन केले आहे, एवढंच नाही तर शंकरबाबा पापडकर यांनी दत्तक घेतलेल्या २३ मुलींचे लग्न देखील लावून दिले आहे.
आता ते त्यांच्या संस्थेमधील आणखी एका मुलीच्या लग्नाची तयारी करत आहेत. वर्षा असे तिचे नाव आहे, मात्र दुर्दैवाने वर्षा बोलू आणि ऐकू शकत नाही, त्यामुळे तिच्या समरूप वर शोधणे फार मोठे आवाहन होते, पण त्यांच्याच आश्रमातील समीर नावाच्या तरुणाने वर्षाचा स्वीकार केला आहे. विषेश म्हणजे वर्षा प्रमाणेच समीर सुद्धा बोलू आणि ऐकू शकत नाही. या विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र वर्षा आणि समीर या दोघांनाही आईवडील नाहीत, त्यामुळे वर्षाच्या कन्यादानाची जबाबदारी आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. तर नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे वर पिता म्हणून कर्तव्य पार पडणार आहेत. आजपासून कौटुंबिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, जिल्हाधिकारी ठाकरे यांच्या कुटुंबाने आज नवं दाम्पत्यासाठी त्यांच्या निवासस्थानी विशेष मेजवानी आयोजित केली होती.
23 वर्षांपूर्वी वर्षा आली होती अनाथालयात