नागपूर - मुंबई नाईट लाईफला म्हणजेच 'मुंबई २४ तास'ला आजपासून(सोमवार) सुरुवात होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. यामध्ये मुंबईतील मॉल, नरिमन पॉईंट आणि बीकेसी या परिसरात नाईट लाईफ सुरू राहील. पोलिसांनाही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आखणी चोख व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राज्य शासनसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काळजी घेणार असल्याचे देशमुख म्हणाले.
मुंबईत नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मंजुरी मिळाली असून आजपासून मुबंई २४ तास सुरू राहणार आहे. यामध्ये मुंबईतील मर्यादित भागात जसे मॉल, मिल कंपाऊंड सोबत नरिमन पॉईंट बीकेसी हे परिसर २४ तास सुरू राहतील. जिथे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न राहणार नाही, अशा ठिकाणी नाईट लाईफ सुरू राहणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. भविष्यात मुंबईचा हा प्रयोग यशस्वी झाला तर येणाऱ्या दिवसात पुणे, नागपूरमध्ये देखील नाईट लाईफ सुरू करण्याचा विचार करू अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देशमुख यांनी दिली.
नागपूरवरून क्राईम कॅपीटल' चा ठपका पुसू-